• jquery photo gallery
  • Home page2
Home page1 Home page22
angular slider by WOWSlider.com v8.0
     

हितगुज श्री साईभजनचे
______________________________________________

मनुष्य कितीही कर्मवादी असला वा आपल्या आयुष्याचा क्रम मृतपिंडांप्रमाणे वाटेल तसा लावता येईल अशी जरी त्याची उमेद असली तरी वा केवळ कर्तृत्वाच्या आणि कर्तृत्वाच्याच जोरावर आपल्या मनोरथांचे आणि स्वप्नांचे इमले रचता येतील अशी त्याची जिद्द असली तरी आयुष्याच्या प्रवासातल्या अनेक अनाकलनीय वळनांचा अंदाज घेणे वा कोणत्याही कार्यात यश अथवा अपयश येणे हे आपल्या हाती नसून त्यांवर कोणत्यातरी अज्ञात शक्तीचे नियंत्रण असते हे कोणासही मान्य कारावे लागेल.

आणि म्हणूनच स्वकर्तृत्वाच्या जोडीला श्रद्धेची, सद्भक्तीची, सद्भावनांची, शुभाशिर्वादांची आणि मनषांतीची गरज असते. आणि म्हणूनच या ज्ञात जगतालाच नव्हे तर विज्ञानालाही वेध घेता न आलेल्या अज्ञात अशा अनंत, अफाट पसरलेल्या विश्वाच्या पसा-याला आणि त्याची सर्व व्यवहाराला नियमितपणे चालविणा-या जगन्नियंत्याला अर्थात परमेश्वराला आपणासारख्या क्षुद्र पामराने शरण जाण्याची वा त्या परमषक्ति पुढे नतमस्तक होण्याची धारणा वेदकालापासून किंबहूना त्याच्याही आदिम कालापासून दिसून येते. आणि म्हणूनच या नश्वर जगातल्या गुंजभर आयुष्यातील यशस्वी वा सुखी म्हणावी अषी माणसे स्वकर्तृत्ववान असतातच पण त्याचबरोबर श्रद्धावान, सात्विक आणि भगवंताच्या कृपेने पुनित व सदा त्याच्यापुढे नतमस्तक आणि निर्गर्वी असलेली आढळतात.

महत्प्रयासाने अंगी बाणवावे लागणारे आणि निराकार स्वप्नांतून साकार यशाकडे नेणारे हे गुण सत्संग व नामस्मरण अणि साईसहवास लाभावा यांचा एकत्रित प्रसाद सर्व इच्छुक जीवांना सहजपणे मिळावा या अध्यात्मिक सद्हेतूने श्री साईभजन सांस्कृतिक मंडळाने श्री सद्गुरू साईनाथांच्या आशिर्वादाने आणि प्रेरणेनेच सन 1999 पासून भांडुप ते श्रीक्षेत्र षिर्डी पालखीसह पदयात्रा सोहळयाचे आयोजन केले आणि केवळ बाबांच्या कृपादृश्टीनेच गेली 15 वर्षे हे यज्ञकार्य अव्याहतपणे सुरू ठेवले हे आपणा सर्वांना ज्ञात आहेच.

जगन्नियंत्याने या जगात पाठविलेल्या प्रत्येक प्राणिमांत्रांत त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्यातही काही विशिष्ट गुणविशेष पेरलेली असतात. या सोहळयाच्या निमित्ताने त्यासाठीचे कार्य करताना प्रत्येक कार्यकर्त्याला, मार्गदर्शकांना, सल्लागारांना, आश्रयदात्यांना त्याचा जिवंत अनुभव आणि प्रचिती येते आणि सर्वजण अपार भाव विसरून तल्लीन होऊन साईचरणांच्या ओढीने बेफाट यथाशक्तिने कामाला लागतो आणि किंबहुना म्हणूनच या सर्वांच्या सदगुणांचा वा दातृत्वाचा परिपाक होऊन श्री साईभजन सांस्कृतिक मंडळ वर्षानुवर्षे अधिकाधिक भव्यदिव्य स्वरूपात स्वर्गीय आनंदाची अनुभूती देणारा दिमाखदार असा पालखीसह पदयात्रा सोहळा त्याचबरोबर विद्यार्थी दत्तक योजना यासरखे कार्यक्रम यषस्वीपणे पार पाडत आहे.

भिक्षा वाढ माई, ही साईनाथांची दिशा घेऊन श्री साईभजन सांस्कृतिक मंडळ हाती भिक्षापात्र घेऊन रहिवाशांच्या, देणगीदारांच्या, आश्रयदात्यांच्या व्दारी हक्कने भिक्षा मागत असते. आणि यथाशक्ति दात्यांकडून आलेल्या भिक्षारूपी शिधा, धान्य वा देणगीतूनच साईभंडारा, पदयात्रा सोहळा, गरीब विद्यार्थी दत्तक योजना होत असतात.

या सर्व उपक्रमांतील कौतुकाची आणि साईभजनसाठी अभिमानाची ठरलेली समाजऋण फेडू पाहणारी गरीब विद्यार्थी दत्तक योजना ही जे का रंजले गांजले या संतवाणीने प्रेरीत होऊन आणि बाबांच्या कृपाषिर्वादाने यशस्वी झालेला उपक्रम आहे.

आपपर आणि उच्चनीच भाव विसरून सर्व जातिधर्माच्या वा गरीब-श्रीमंत जीवांनी एकत्र बसून प्रेमभाव वृध्दिंगत करून सर्वांनी आयुष्यरूपी महाप्रसादाचा एकत्र आस्वाद घ्यावा आणि जीवन नावाच्या संधीचा सुखास्वाद घ्यावा अर्थात सुखे जगावे या उदात्त आणि अहंभाव नष्ट करणा-या सहभोजनाची प्रथा देखील भंडारारूपाने सुरू केली. श्री साईभजन देखील शिर्डीहून परतल्यावर साईभंडा-याचे आयोजन करून सांगता करते ते यासाठीच. 

।। जय साई ।।

 
LIVE DARSHAN SHIRDI

<<< Click on Image >>>
 
Events / कार्यक्रम

दिनांक 15 आॅगस्ट 2015 रोजी सकाळी 7.30 वाजता श्री. साईमंदीर, खिराडे कंपाऊंड येथे श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण आयोजीले आहे. तरी सर्व साईभक्तांनी व पदयात्रिंनी याची नोद घ्यावि...

Addvertisement


  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • >image slider jquery
  • 7
css slideshow by WOWSlider.com v8.0

 

 

     

Address :
Contact Us: Joint Now:

श्री साईभजन सांस्कृतिक मंडळ,
26, आदर्श सहकार सोसायटी,
गणेश नगर, गणेश पथ,
भांडुप (प.), मुंबई 400078

Email .:

shreesaibhajan.gmail.com

Ph. No.:

+91 9869149369
+91 9869983860

  Facebook
  You Tube
  Google Pluse
© All Rights reserved for Shree Saibhajan Sanskrutik Mandal (Bhandup, Mumbai)