श्री साईभजन सांस्कृतिक मंडळ
______________________________________________

हितगुज करावे परांशी । सूज्ञांस काय नवे सांगावे ।।

हे म्हणण्याचे कारण हे की आज श्री साईभजनने स्वतः काही वेगळे सांगावे असे उरलेले नाही, साईभजनच्या नियोजनबद्ध आणि यशस्वी अशा प्रत्येक कार्यक्रमांची माहीती, त्यांच्याशी संबंधित वा असंबंधित प्रत्येक साईकार्यकर्ता, साईभक्त, साईसेवक, देणगीदार, जाहीरातदार याना श्री साईप्रेरणेने आपसूकच माहीत असते, किंबहुना या प्रत्येक साईकार्यात आपला काही ना काही खारीचा वाटा उचलावा यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो, याचे महत्वाचे कारण म्हणजे साईभजन ही एक संस्था नसून परिवार आहे आणि येथे पदाधिकारी हे पदच नसून प्रत्येकजण परिवारातील सदस्य आहे.

आपल्या कार्यातील म्हणण्यापेक्षा श्री साईंच्या व साईशिकवणींच्या प्रसाराच्या व या कार्यातील केवळ साई इच्छेनेच निमित्त झालेल्या श्री साईभजन सांस्कृतिक मंडळ स्थापन होते काय, त्याच्या पदयात्रेपासून सुरू झालेल्या आणि तद्अनूषंगाने निरनिराळया बहूसमाजोपयोगी योजनांना केवळ उदंड प्रतिसादच नव्हे तर खांद्याला खांदा लावून उमेदीने हे साईकार्य यशस्वी करण्यासाठी आपपरभाव विसरून आणि केवळ साईभक्त आणि साईसेवक या नात्यानेच साईराम या मंत्राचे नामोच्चारण करीत संपूर्ण मुंबई उपनगर प्रदेशांतच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व साईभक्तांमध्ये, सामाजिक संस्थामध्ये आदराचे आणि मानाचे स्थान निर्माण करतात आणि कोणताही उद्देश न ठेवता आपसुक झालेल्या अध्यात्मिक व सामाजिक कार्यातून लाभ झालेल्या सामान्य नागरीकांपासून, विद्याथ्र्यांपासून ते सर्व थरातील साईआशिषाचा प्रसाद पावून श्री साईभजनच्या कार्यात समरसून जातात आणि त्याचा विस्तार हा असा वाढत जाताना पाहून नवी उमेद मिळते, नवी उर्जा मिळते, मिळत राहते.

उर्जेबद्दल विषेशत्वाने सांगायचे तर आजच्या तरूणाईकडे प्रचंड उर्जा आहे पण त्याचा योग्य वापर करण्याचे सुयोग्य मार्गदर्शन करणारे कोणी नाही. परिणामी ती लोप पावते, वा तिचा काही समाजकंटकांकडून गैरवापर होतो आणि आपल्या आसपासची अनेक उदाहरणे त्याचा प्रत्यय देतात. परिणामी एकूणच समाजाचा व त्या व्यक्तिचा, परिवाराचा विकासच खंुटतो प्रसंगी आत्मनाशही होतो.

अगदी याउलट साईचरणांकडे समर्पित झाल्याने व आपसुकच साई शिकवणीप्रमाणे सकळजनांचे जीवन सत्संग वा समाजोपयोगी कार्याने उद्धरण्यातच मग्न झाल्याने साईपरिवार व स्वपरिवार आनंदी व सुखदायक झाल्याची अनुभूती श्री साईभजनच्या सन्निध्यात आलेला प्रत्येक साईसेवक नणू क्षणेक्षणी साईराम चा उद्घोष करीत सांगत सुटतो. त्या वेळी बाबांनी दीलेल्या त्या वचनाची आठवन होते-

शरण मज आला आणि वाया गेला । दाखवा दाखवा एैसा कोणी ।।

श्री साईप्ररणेने श्री साईभजनात जो दंग झाला त्या प्रत्येकाला अफाट उर्जेचा स्वयंशोध घेता आला. आध्यात्मिक सुसंगतीने तो स्वतःच्या, स्वपरिवाराच्या आणि आपल्या आसपासच्या भोवतालच्या परिस्थितीत सतत सुधारणा करण्याचे परमकर्तव्य करण्यास जागृत झाला. आणि म्हणूनच जो तो आपल्या परीने साईभजनच्या भव्यदिव्य पालखी सोहळा, साईभंडारा, विद्यार्थि दत्तक योजना, श्री साईभजन गोविंदा पथक, प्रबोधनात्मक साईच्चरित पारायण अशा उपक्रमांत तन मन धन झोकून तल्लीन झाला.

आणि म्हणूनच सन 1999 पासून सुरू झालेल्या या श्री साईभजन नामक कल्पवृक्षाला रापटयाला बहर येत गेला आणि आजचे नेत्रदिप विस्तार स्वरूप् पाहताना विशेष आनंद होतानाच महाराष्ट्रभर किर्ती होत असताना पाहून नव्याने सामील होणाÚया तरूणाईचा उत्साह पाहताना हा कल्पवृक्ष पिढयानपिढया श्री साईभजनचा आनंद देतच राहील यात तिळमात्र शंका नाही.

सार्थक जन्माचे होवो । जीवा मिळो समाधान ।।
सत्संग कल्पतरूचा घाडो । ध्यानीमनी श्री साईभजन ।।
परोपकार येणे होतच रहावा । जीव प्रत्येक व्हावा साईराम ।।

।। श्री साईराम ।।

श्री साईभजन सांस्कृतिक मंडळ

     

Address :
Contact Us: Joint Now:

श्री साईभजन सांस्कृतिक मंडळ,
26, आदर्श सहकार सोसायटी,
गणेश नगर, गणेश पथ,
भांडुप (प.), मुंबई 400078

Email .:

shreesaibhajan.gmail.com

Ph. No.:

+91 9869149369
+91 9869983860

  Facebook
  You Tube
  Google Pluse
© All Rights reserved for Shree Saibhajan Sanskrutik Mandal (Bhandup, Mumbai)