• पालखीसह पदयात्रा सोहळा
  • विद्यार्थि दत्तक योजना
Coming soon........

विद्यार्थि दत्तक योजना
________________________________________________________________________________________

‘श्री साईभजन सांस्कृतिक मंडळ’ ही संस्था सामाजिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असुन या सर्व उपक्रमातील कौतुकाची आणि साईभजनासाठी अभिमानाची ठरलेली समाजऋृण फेडू पाहणारी गरीब ‘‘ विद्यार्थि दत्तक योजना ’’ ही जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे जो आपुले या संत वाणीने प्रेरीत होऊन आणि बाबांच्या कृपाशिर्वादाने यशस्वी झालेला हा उपक्रम आहे.

भिक्षा घाल माई, ही साईनाथांची दिक्षा घेऊन ‘‘ श्री साईभजन सांस्कृतिक मंडळ ’’ हाती भिक्षापात्र घेऊन रहीवाशांच्या, देणगीदारांच्या, आश्रयदात्यांच्या व्दारी जाऊन भिक्षापात्रात आलेल्या देणगीतुन पालखीसह पदयात्रा, श्री साईभंडारा अशा धार्मिक उपक्रमांबरोबरच सामाजिक बांधिलकीतुन तसेच दीनांचा कनवाळू साईनाथांच्या विचाराने प्रेरीत होऊन 4 विद्यार्थी घेवुन सुरू झालेल्या या ‘‘ विद्यार्थि दत्तक योजने ’’ अंतर्गत आज 154 विद्यार्थि लाभ घेत आहेत.

‘‘ विद्यार्थि दत्तक योजने ’’ आंतर्गत भांडुप विभागातील विविध शाळांमधुन आर्थिक दृष्टया दुर्बल परंतु गुणवंत विद्यार्थाचा संपूर्ण वर्षासाठी येणारा शालेय खर्च (उदा. गणवेश, वहया, पुस्तके, संगणक फी, इमारत निधी, वार्षिक शालेय फी, छत्री, बॅग, तसेच शैक्षणिक साहित्य) मंडळातर्फे देण्यात येते.

श्री साईभजन सांस्कृतिक मंडळाच्या ‘‘ विद्यार्थि दत्तक योजने ’’ अंतर्गत खालील नमुद नियमानुसार इच्छुक आणि पात्र विद्याथ्र्याचे नांव विद्यार्थी दत्तक योजनेत सामाविष्ट केले जाते.

1) वडील हयात नसलेल्या विद्याथ्र्याचे नाव विद्यार्थी दत्तक योजनेत समाविष्ट केले जाते.
2) विद्याथ्र्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 60,000 किंवा त्यापेक्षा कमी असल्यास.
3) इच्छुक विद्यार्थि भांडुप विभागातील कोणत्याही शाळेत मराठी, हिंदी, गुजराथी, उर्दु ( इंग्रजी माध्यम वगळता) माध्यमाचा असावा.
4) इयत्ता 1 ली ते 10 वी या इयत्तेमधीलच विद्यार्थी दत्तक घेण्यात येतील.
5) इच्छुक विद्याथ्र्याने वार्षिक परीक्षेमध्ये 60 टक्के अथवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणे बंधनकारक आहे.

     

Address :
Contact Us: Joint Now:

श्री साईभजन सांस्कृतिक मंडळ,
26, आदर्श सहकार सोसायटी,
गणेश नगर, गणेश पथ,
भांडुप (प.), मुंबई 400078

Email .:

shreesaibhajan.gmail.com

Ph. No.:

+91 9869149369
+91 9869983860

  Facebook
  You Tube
  Google Pluse
© All Rights reserved for Shree Saibhajan Sanskrutik Mandal (Bhandup, Mumbai)